प्रतिनिधी मुरली राठोड मो 9307493402
दिनांक 15 जानेवारी…
राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीचा उत्सव राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने यवतमाळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम 15 जानेवारी 2025 रोजी मंगलमूर्ती नगर,आर्णी रोड, यवतमाळ येथे पार पडला.
कार्यक्रमात शिवमती प्रा.सोनल देशमुख यांनी मासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अभिनयातून उलगडले,ज्यामुळे महिलांना त्यांच्या शौर्य,चातुर्य,आणि राजनीतीतील कौशल्याची प्रेरणा मिळाली.यावेळी जिल्हा अध्यक्षा सोनई यवतकर यांनी महिलांनी समाजकारणासाठी राजकारणात उतरावे आणि समाजासाठी योगदान द्यावे,असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष सीमा ठोकळ यांनी केले तर शहराध्यक्ष अबोली दिक्कर देशमुख यांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर महिला उपस्थित होत्या,ज्यात जयश्री बागडे,कमला बागडे,सत्यभामा ठाकरे,आणि इतर अनेक महिलांचा समावेश होता.
या उत्सवाच्या अखेरीस शहराध्यक्ष अबोली दिक्कर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाने मासाहेब जिजाऊंच्या विचारांचा वारसा आणि प्रेरणा पुन्हा एकदा उजळून निघाली.
🚩माऊली.
Discussion about this post