रावेर (प्रतिनिधी)- रावेर तालुक्यातील बनाना सिटी अशी ओळख असलेल्या सावदा शहरात अखंड स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त प्रतीमा पुजन कार्यक्रम पार पडला ..
सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेशभाऊ वानखेडे यांच्या हस्ते सावदा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात संध्याकाळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त प्रतीमा पुजन व मानाचा मुजरा करून अभिवादन केले यावेळी शहरवासीय उपस्थित होते.
Discussion about this post