वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही संस्था शेतकऱ्यांना रासायनिक कडून ऑरगॅनिक कडे जाऊन यशस्वी शेती कशी करायची या बाबत मार्गदर्शन करते . आणि पाण्याचे योग्य त्या प्रकारे बांधबंदिस्त करून भूगर्भात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे .
गाव विकास समितीची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वॉटर संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध उपक्रमां संदर्भात माहिती दिली. यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश आहे:
- सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार)
- गांडूळ खत निर्मिती बेड
- मुरघास बॅग
- अझोला निर्मीती बेड
- सायकल कोळपे
- टोकन यंत्र
- फळबाग लागवड
- सिटी कंपोस्ट
- महीला मेळावा
- अभ्यास सहल
वरील विषय संदर्भात संस्थेचे प्रशिक्षित अधिकारी वेळी च्या वेळी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात . संस्थेच्या मार्फत अत्यंत कमी लोकवाट्यावर साहित्याची वाटप करून त्याचा योग्यते ऑरगॅनिक पद्धतीने वापर कसा करायचा याची माहिती देतात
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे .
Discussion about this post