किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता कामासाठी बांधकाम विभागाकडून वनविभागाकडे आवश्यक रक्कम जमा, वनविभागाने तातडीने मुदत वाढ देवून काम सुरु करण्याची मागणी – उपोषणकर्ते रघुवीर शेलार
आजरा – चंदगड, प्रतिनिधी
पारगड ते मोर्ले रस्त्यासाठी दोडामार्ग तसेच चंदगड हदीतील काही वन विभाग यांच्या मालकीची जमीन गेली. हजारो झाडे कापून चंदगड दोडामार्ग येथून चार वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली. पण देवगड येथील ठेकेदार याने ज्यांना काम करायला सांगितले त्यांनी काम वेळेत केले नाही. यामुळे वन विभाग यांनी रस्ता कामासाठी दिलेली मुदत संपली यामुळे चार वर्षे काम रेंगाळत पडले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असा आरोप केला जात आहे.
गेली चार वर्ष पारगड मोर्ले रस्त्याचे काम बंद आहे हा रस्ता काम सुरू झाले पाहिजे यासाठी ग्रामस्थानी अनेक अंदोलने सुरु केली यानंतर या कामाला सुरुवात झा…
Discussion about this post