अखेर त्या जनहितार्थ राखीव जमिनीवरील बेकायदेशीर खरेदी विक्री व कलम ४२ ब प्रकरणात उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश ! एन ए पी ३६आधारे गैरव्यवहार करणाऱ्यांमध्ये ऊडाली एकच खळबळ!!
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, मलकापूर शहरातील गट नंबर १९०/१ही जमिन जनहितार्थ बगिचा व दुकान समुहासाठी विकास आराखड्यात राखीव ठेवण्यात आलेली आहे.परंतु जमीन मालक वसंत पुरुषोत्तम पाटील यांनी घोळ करून ॲडिशनल तहसिलदार खामगाव यांचेकडून एन ए पी ३६चा आदेश मिळवून एक बेकायदा लेआऊट तयार केला व त्यापैकी दोन प्लांट डॉ.जैन व हेमंत भटृड यांना विकले.या बोगस प्रकरणाचे बिंग फुटल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येऊन डॉ.जैन व भट्टड याची गाव नमुना सातवरुन नांवे कमी करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी पारीत केला व त्यानुसार त्यांची नावे कमी करण्यात आली.
यानंतर तब्बल १०/१२ वर्षानंतर २०२०मध्ये डॉ.जैन व भट्टड यांनी बनवाबनवी करून खोटेनाटे दस्तऐवज दाखल करून व खोटी माहिती देऊन तहसिलदार मलकापूर यांचेकडून कलम ४२ ब चार आदेश प्राप्त केला.डाॅ.जैन यांनी या अवैध लेआऊट मध्ये विकत घेतलेल्या प्लाटवर अनेक वर्षापुर्वी अवैध इमारत बांधकाम सुद्धा केले आहे. या सर्व अवैध व बेकायदा प्रकरणाची तक्रार रिपाइं ज्येष्ठ नेते व पत्रकार भाई राजेश इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली असता उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिल्याने शहरातील एन ए पी.३६चे गैरव्यवहार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post