प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रे
परभणीः मातंग युवक सुरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून आरोपीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपीना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने 22 जानेवारी 2025 रोजी परभणी शहरात ‘नरबळी प्रतिशोध मोर्चा’ निघणार आहे, या मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गंगाखेड शहरातील युवक सुरज गंगाधर जाधव याचा 29 डिसेंबर 2024 रोजी परभणी-गंगाखेड रोडवर बाह्राणगाव शिवारात अपघात झाला होता. झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असून सुरज जाधव चा खून झाला आहे असा आरोप मयत सुरज जाधव यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे. सुरज जाधव याच्या मृत्यूची चौकशी करावी आणि संशियता विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर रोड परभणी येथून मोर्चा निघणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. निघणाऱ्या ‘नरबळी प्रतिशोध मोर्चात’ हजाराच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉग्रेड गणपत भिसे, बबिता जाधव, पूजा सुरज जाधव, गणेश गायकवाड, नेहा जाधव, राम गायकवाड, राजू कर्डीले, आप्पाराव मोरताटे, दत्ता तांबे, बबन नेटके, लक्ष्मण कांबळे, के. के. भारसाकळे, उत्तम गोरे, प्रकाश बनपट्टे, ज्ञानेश्वर मोरे, अविनाश मोरे, अशोक उबाळे, एल. डी. कदम, कुणाल गायकवाड, करण सावळे, कारभारी कांबळे, अमोल रणखांब, श्रीरंग रणखांब, गुरु सावळे, किशोर कांबळे, हेमंत साळवे, अमर गालफाडे, अजित शिंदे, गंगाधर गायकवाड, प्रकाश गायकवाड, कोंडीबा जाधव, दगडू थोरात, पिंटू घोडके, अनिल मोहिते, रोहिदास लांडगे, दिलीप कांबळे, सारजाबाई भालेराव, जाणकाबाई वाव्हळे, गिरिजाबाई कांबळे, जनाबाई वैरागड, शशिकला गायकवाड, शेषराव गायकवाड, एम. एल. गवारे, अण्णाभाऊ उबाळे, प्रल्हाद उबाळे, आश्रोबा उफाडे, भागवत जलाले, हनुमंत कंधारे, माधव बिंडे, माधव सरोदे, सुनील जाधव, संविधान भिसे, तथागत झोडपे, गजानन कसबे, साहेबराव भालेराव, मारोती बनसोडे, विजय पाणबुडे, शिवा नेटके, अमन कदम, सुरेश पवार, कृष्णा लांडगे आदींनी केले आहे.
Discussion about this post