लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ही महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेमधून तब्बल 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. कारण सरकारच्या या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होतात.
मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेमधून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली आहेत. याप्रकरणी डिसेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका झाला आहे. परंतु, ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. मात्र आता यासंदर्भात सरकारकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे आता महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post