कळमनुरी प्रतिनिधी :- प्रसाद गावंडे
लॉयन्स नेत्र रुग्णालय व कै गंगाधर रावजी लोमटे यांच्या स्मरणार्थ भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन डोंगरकड़ा येथे करण्यात आले होते .
या शिबिराचे उद्घाटन माननीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रावसाहेबजी अडकिने यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवाजी उर्फ पप्पू अडकिने, बाळासाहेब राव लोमटे, डॉ नागेश कुलकर्णी जनार्दनराव गावंडे, सुभाषराव अडकिने, यशवंत पंडित, किसन अडकिने उद्धवराव गावंडे. नारायणराव गावंडे अनिकेत अडकिने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे नियोजन काशिनाथ पाटील, बालाजी सोनटक्के संतोष कांबळे दिलीप सोनटक्के बंटी लोमटे. संदीप जोगदंड. मोतीराम कदम राजू अडकिने ओम राठोड डिगू शिंदे व सर्व मित्र मंडळ यांनी सहभाग घेतला. डॉ. सोनाली भंडारे मॅडम यांनी नेत्र तपासणी केली या शिबिरास ओपीडी 380 रुग्ण तपासले त्यात 48 रुग्ण मोतीबिंदूशस्त्रक्रिया चे होते मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले .
डोंगरकडा सर्कल जवळा सर्कलमधील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबीराचे आयोजन डॉ. सुधाकर राव लोमटे यांनी केल होते, ते दरवर्षी शिबिराचे आयोजन करत असल्याने त्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post