लोहारा तालुका पाचोरा प्रतिनिधी लोहारा येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी डॉ. जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालयात आयोजित स्पर्धेची सुरुवात दादा श्री विश्व लॉन्स येथून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेचे रिबीन कापून सुरुवात केली यावेळी खुल्या 6 किमी गटात प्रथम क्रमांक दिपक भोई शेंदुर्णी, दुतीय क्रमांक गोपाल कोळी, तृतीय क्रमांक सौरव राजपूत शेंदुर्णी, 3 किमी गटात प्रथम क्रमांक सुरज माळी शहापुरा, द्वितीय क्र,करण नवघरे जंगीपुरा, तृतीय क्र, हर्षल भोई शेंदुर्णी, 200 मिटर शालेय गटात मुलांमध्ये प्रथम क्र, प्रथमेश धोबी लोहारा, दुतीय क्र, प्रितेश कुंभार, तृतीय क्र, भूषण मीना मुलींमध्ये प्रथम क्र, नेहा राजपूत कासमपुरा, द्वितीय क्र, मोनाली कोळी, तृतीय क्र, डिंपल थोरात, तर 100 मीटर, मुलांच्या गटात प्रथम क्र, आसिफ पिंजारी, द्वितीय क्र, मोहन कोळी, तृतीय क्र, सार्थक चौधरी, मुलींच्या गटात प्रथम क्र,दुर्गेश्वरी परदेशी, द्वितीय क्र, खुशी कैलास गोंधळे.
या स्पर्धेत 1ते 3 क्रमांक आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी रोख रक्कम प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नरेंद्र मोदीजी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली त्या त्यांच्या खाजगी कामानिमित्त व्यावसायिक प्रितेश चौधरी यांच्याकडे आल्या होत्या, त्यांचा सत्कार गावातील ग्रामस्थ पदाधिकारी यांनी केला कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ शरद अण्णा सोनार , डॉक्टर सागर दादा गरुड ,विकास सोसायटी चेअरमन प्रभाकर चौधरी, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय काळे साहेब ,कृषी भूषण विश्वासराव पाटील, सरपंच, पोलीस पाटील शेळके, अमृत चौधरी, लक्ष्मण माळी, पटेल सर, भोसांडे गुरुजी, सुरेश चौधरी, ईश्वर देशमुख, दिगंबर चौधरी, उमेश देशमुख, बाळू डॉक्टर, गुणवंत सरोदे नंदू सुर्वे, हितेश पालीवाल, लोहारा पत्रकार मंच ,इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून ढोणे सर, तडवी सर, गुजर सर सुर्वे सर , कलाल सर, गायकवाड सर, यांनी काम पाहिले.




Discussion about this post