
लोणार ता प्र सुनील वर्मा
मानवतावादी गुरू रविदासभारतात प्राचीन काळापासून समाजाला अंधश्रध्दा कर्मकांड, रुढीवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता, शोसन व जातीयवादाची कीड लागलेली होती. याच काळात भगवान महावीर व गौतम बुध्द या परिवर्तनवादी महामानवांचा जन्म झाला आणि मानवतावादाचे सुत्र भारतीयांना दिले. मध्ययुगाच्या पुर्वार्धात भारतावर मुस्लीमांचे आक्रमण झाले आणि जातीयतेला कंटाळलेले लोक धर्मांतर करू लागले मध्ययुगाच्या उत्तरार्धात अनेक परिवर्तनवादी संत जन्माला आले त्यात कबीरदास, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, नरहरी, सावता, गोरोबा आणि संतांचे शिरोमणी संत शिरोमणी गुरू रविदास, गुरु रविदासांचा जन्म १५ फेब्रु १३९८ मध्ये रविवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी काशीनजीकच्या गोवर्धनपूर येथे चवरवंशात रघुराम व तुळसादेवी या दाम्पत्याच्यापोटी जन्म झाला.वयाच्या १२ व्या वर्षापासून संतसमागमात संतसमागमात रमुन ज्ञानप्राप्त केले आणि अंधश्रध्दा, कर्मकांड, मनुवाद, रूढीवाद, पुरोहितवाद, अस्पृष्यता व शोसनावर कडाडून टिका करीत लिखान करून परिवर्तनाची मुहूर्तमेठ रोवनारे गौतमबुध्द व भगवान महावीर यांच्या तत्वांचे पूर्णपणे आत्मसात करून समाजात क्रांतीकारक बदल घडवून आनण्याकरिता महत्वाचे कार्य केले.रविदासांनी आपल्या वाणीने समाजात जनजागरण करण्याचे कार्य केले.पराधिनता पाप है, जन लेहुरे मितlरविदास दास प्राधीन सो कौन डरे है प्रित।।अर्थात:- गुलामगिरी करून घेणान्यापेक्षा गुलामी करनारा जास्त दोशी आहे. व गुलामाशी कोणीही प्रेम करत नाही. म्हणून बंड करण्याचा संदेशही रविदासांनी दिला जातीयवादावर रविदासांनी प्रहार केला.जात पात के मंहि, उरझी रहद्र सब लोग। मानुषका कुं खात हई, रविदास जात कर रोगllमानवातील मानुसही ही जातीवादीच्या रोगाने नष्ट केली आहेरविदास जन्मके कारनौं, होत न कोऊ निचlनर कूं निच करिडारी है, ओछे करम को किच llमानुस जन्माने उंच किंवा निच होत नाहीतर त्याचे कर्मच त्याचा उंच किंवा निच करतात. जात जात में जात है, ज्यो केलनमे पात l’रविदास’ न मानुष जुड सके, जो लौ जात न जातllजातीचे झाड केळीच्या झाडासारखे आहे त्याला खोड नाही फक्त पान आहे आणि तेही शेवटपर्यंत म्हणजे जाती व्यवस्थेस कोणताही आधार नाही.जन्मजात मत पुछिओ, का जात अरु पात। रविदास” पूत सभ प्रभू के कोऊ नहीं जात कुजात ।।कोनीही अस्पृष्यनाही सर्व एकाच ईश्वराचे लेकर आहेत मग उच्च किंवा निच कसे होऊ शकतात, गुरु रविदासांनी फक्त जातीयवादादवरच नव्हे तर साम्यवादावर सुद्धा आपली शिकवन समाजाला दिली आहे.अह हम खुब वतन घर पाया,ऊँचा खेर सदा मन आया।। बेगमपूर शहर हो जाऊ, दुःख अंदोह नही तोही ठाऊ।।रविदास आसे राज्य आभीप्रेत होते की तेथे सर्वांचा प्राथमिक गरजा पूर्ण होओत पोटभर अन्न मिळो आणि शुद्रांपासून ब्राम्हणांपर्यंत सर्व एकाचपंगतीत समान बसलेले म्हणजे उच्चनीचतेची कोणतीही दरी समाजात नसावी असे राज रवि दासांनी अभिप्रेत होते.रविदास ब्राम्हणमत पुजिए, जऊ होवे गनहिन । पूजिही चरण चंडालके, जऊ होवे गुन चरविन ।।उंचे कुल के कारणों, ब्राम्हण कोय न होय।जो जन है ब्रम्ह आत्म रविदास ब्राम्हण सोय।। उच्च कुळात जन्मलेला जर निबुद्ध असेल त्यास समानतेचे ज्ञान नसेल तर त्याची पुजा करू नका परंतु एखाद्या अस्पृष्य घरात ज्ञानी व्यक्ती जन्माला त्याचे मोल करा .माझा असा देश असावा ज्यात सर्व कोड उंच उंच घरात राहतील, त्या देशात कोणतही दुःख नाही यातना नाही सर्व आनंदी असतील असा देश असावा. गुरु रविदासांच्याही वाणींचा अभ्यासकेला आणि रविदासांना आपल्या गुरूस्थानी मानुन ‘अच्चीदीकेशन ऑप कास्ट’ हा ग्रंथ रविदासांना अर्पणआला असेल तर त्याची सर्वांनी पुज्यस्थानी मानून त्याचे विचार आचरणात आना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या मसुहा कमीरीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्व जाती धर्माचा धर्मगुरु यांचा अभ्यास केलाऐसा चाहु राज मै, जहा मिलै सब न को अन्नछोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न ।बाबासाहेबांच्या अभ्यासात हे आल्यानंतरगुरू रविदासांचा एकाच दोह्यामध्ये भारताची संपूर्ण राज्यघटना एकवटलेली आहे. असं राज्य आसाव येथे सर्वांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे, ते स्वतंत्र्य असावे आणि सर्वांत समता मानावी कोणीही उच्च किंवा निच नसावं सर्व सामान असावे संपूर्ण साम्यवाद रविदासांनी आपल्या दोह्यातून प्रकट होतांना दिसते.म्हणून गुरू रविदासांना आद्यक्रांतीकारक, साम्यवादी व परिवदर्तनवादी संत म्हणून संत शिरोमणी अशी उपाधी त्यांना देण्यात आली आहे. रविदास जयंती निमीत्त त्याच्या अनेक पैलू मधून एका पैलूची छोटीशी छटा येथे रेकाटण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. रविदास जयंती निमीत्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. गुरुप्रा. डॉ. गोपाल बछिरे इतिहास संशोधक
Discussion about this post