नुकताच सांगलीतील एका उद्यानामध्ये शाळकरी मुले इ सिगारेट सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. याआधीही नशेखोर तरुण उद्यानांमधून नशा करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महापालिका प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत यापुढे चिल्ड्रन्स पार्क आणि उद्यानांमधून पोलीस प्रशासनाच्या मदतीने करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ते म्हणाले सांगलीतील एका उद्यानामध्ये सात आठ विदयार्थी इ सिगारेट चे सेवन करत असल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमधून दाखवला गेला महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून यापुढे उद्यानांची वेळ सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते ८ इतकी सीमित ठेवण्याचा निर्णय घेतला असून उद्यान विभागातील कर्मचारी पोलीस यंत्रणेच्या मदतीने उद्यानांमधून करडी नजर ठेवतील. महापालिका क्षेत्रामध्ये एकूण २१ हरित क्षेत्र विकसित आहेत आणि ३१ लहान मोठी उद्याने आहेत यातील दाट वृक्षराजी असलेल्या उद्याने आणि हरित क्षेत्रे हि नशेखोरांचे अड्डे बनले आहेत. मात्र यापुढे उद्यान कर्मचाऱ्यांची या नशेखोरांवर करडी नजर राहील पोलीस प्रशासनालाही आम्ही उद्यानांमधून गस्त घालण्यासंदर्भात विनंती पत्र दिले आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले
Discussion about this post