रत्नागिरी तालुक्यातील कांबळेलावगण जि. प. प्राथमिक शाळेतील विदयार्थ्याचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. १८फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रौ ७. ३० ते ११. ३० या वेळेत संपन्न होणार आहे.
या शाळेत मुख्याध्यापक म्हणुन रुजू झाल्यापासून श्री. सुशील वासावे सर यांनी अनेक उपक्रमशील कार्यक्रम राबवले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा या गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणाऱ्या असल्याने या शाळा टिकवून ठेवण्यासाठी श्री. वासावे सर आणि सुर्वे मॅडम अथक प्रयत्न करत आहेत. तसेच पालक व गावातील सर्व ग्रामस्थ त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत.
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना सुसंस्कृत घडविण्याचे काम आईवडिलांनंतर शिक्षकांचे असते. विध्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणुन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असुन सर्व मुलांनी आवडीने सहभाग घेतला आहे.
हे कार्यक्रम शाळेच्या रंगमंच्यावर सादर होणार असुन परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलांना आशीर्वाद द्यावे व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे शाळा व्यवस्थापन समिती कडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post