
शिवजन्मोत्सवानिमित्त कॉर्नर बैठक संपन्न
.उदगीर (श्रीधर सावळे) येथील पंचमुखी हनुमान मंदिर , गणेश नगर येथे शिवजन्मोत्सव निमित्त कॉर्नर बैठक घेण्यात आली. विभागीय अध्यक्षा डॉ. विद्याताई पाटील व विभागीय कार्याध्यक्षा मीनाक्षीताई पाटील यांनी आयोजन केले . गणेशनगर भागातील खूप महिला या बैठकीमध्ये सहभागी झाल्या होत्या . जिजाऊ वंदना घेऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली .डॉ विद्या पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले. 18 व 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धा ,व्यख्यान याविषयी सविस्तर माहिती, व मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष कल्पना चव्हाण यांनी केले.या वेळी तिथे जिजाऊ ब्रिगेडच्या दोन्ही जिल्हा अध्यक्षा शिवमती सुमित्रा पवार , शिवमती कल्पना चव्हाण, तसेच उप जिल्हाध्यक्षा राणिताई दळवी ,सचिव वणीताताई देवसरकर ,अर्चना होगे, कार्याध्यक्षा सुनीता कल्याणकर, तालुका अध्यक्ष सुनीता बोगणें. संघटक किर्तीताई मीवळे, भारती नवाडे, संगीता सूर्यवंशी, सुरेखा पाटील , प्रदेश प्रवक्ता भारती मढवाई , वासवी क्लब च्या गंगूताई नलबलवार, माधुरी शर्मा, शिवानी जाधव, अडकीने काकू , चौधरी काकू, स्वाती फुके , प्रीती फुके, गाढेगावकर, कुलकर्णी ताई, मोनाली पाटील, विजया वाघमारे , कमल सूर्यवंशी, अपर्णा लहानकर उपस्तीत होत्या .
Discussion about this post