” मी शब्दांना मशाल करतो” संग्रहाला उत्कृष्ट गझलसंग्रहाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
राजुरा: ऍग्रोन्यूज परिवार चैरिटेबल फलटणच्या राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यात २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट गझलसंग्रहासाठी दिला जाणारा साहित्य सेवा पुरस्कार राजुरा येथील प्रसिद्ध गझलकार श्री. दिलीप सीताराम पाटील यांच्या “मी शब्दांना मशाल करतो” या गझलसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
श्री. दिलीप सीताराम पाटील हे पंचायत समिती राजुरा अंतर्गत सोनुर्ली येथे जिल्हा परिषद शाळेत भाषा विषय शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे “हारलो पण अंत नाही” व “मी शब्दांना मशाल करतो” हे दोन गझलसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. “मी शब्दांना मशाल करतो ” या संग्रहाला मिळालेला यावर्षीचा हा दुसरा पुरस्कार आहे. सदर पुरस्कार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी फलटण येथे संपन्न होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी ८ व्या साहित्य संमेलनात प्रदान केला जाणार आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Discussion about this post