
श्री. सिध्दीविनायक मल्टीस्टेट को. ऑप.क्रे. सो. संस्थेला बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे 29 ते 31 जानेवारी 2025 मध्ये झालेला राज्यस्तरीय बँको सहकार परिषदेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजकुमार जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला..
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट ला प्रतिष्ठित ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार संस्थेच्या विश्वासार्हतेचा, उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि ग्राहकनिष्ठेचा सन्मान म्हणून दिला जातो.संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व कर्मचारी व सदस्य सभासद परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. या सन्मानामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट यांची प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे..
प्रतिनिधी – अमोल विक्रम ओव्हाळ धाराशिव..
Discussion about this post