आज ही पोस्ट लिहित असताना राजकीय भावना बाजूला ठेवत सामाजिक भावनेला व मैत्रीत्वाच्या नात्याला महत्त्व देत
आपल्या मित्राची पक्षीय स्तरावरची भूमिका मांडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करत आहे
सोमनाथ बोरसे
सोमनाथ बोरसे हा उच्चशिक्षित व मध्यमवर्गीय कुटुंबातील साईनगर भागातील रहिवासी लहानपणापासूनच संघ कार्याचे वेड असणारा आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या परीने सामाजिक स्तरावरती काम करण्यास सुरुवात केली. काम करत असताना सदैव प्रसिद्धी माध्यमांच्या पासून दूर राहत त्याने अनेक सामाजिक कार्य केले
या सामाजिक कार्यामधून त्याने प्रभागापासून ते शहरापर्यंत असा दांडगा जनसंपर्क तयार केला सर्व प्रभागात तालुक्यात त्याचा दांडगा जनसंपर्क आहे बोलण्याचे वाकचातुर्य या गुणधर्माने त्याने अनेक माणसे जोडली आहेत आपल्या परीने तो सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जातो व त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो
अशा या सोमनाथ चा सामाजिक कार्याला अधिकाधिक बळकटी मिळावी व सामान्य लोकांचे व गरजू घटकाचे प्रशासकीय स्तरावरील कामे अधिक जलद गतीने व्हावे या हेतूने सर्वसामान्य लोकांमधून व मित्रपरिवारांमधून एक भावना व्यक्त केली जात आहे की सोमनाथ बोरसे याची संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय सदस्य पदी निवड व्हावी
जेणेकरून या पदाच्या माध्यमातून तो गरजू व निष्ठावंत घटकाला नक्कीच न्याय देईल
अशा या सोमनाथच्या कार्याची पक्ष स्तरावर ती दखल घ्यावी या संदर्भात
माननीय महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
व तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार अमोल जी खताळ यांना एक निवेदन सर्व मित्र परिवाराच्या वतीने लवकरच देण्यात येणार आहे
(ही पोस्ट राजकीय नसून सोमनाथ यांच्या मैत्रीत्वाच्या बंधातून व्यक्त केलेली भावना आहे)
Discussion about this post