
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगलादेवी येथे मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.गावामध्ये सर्वप्रथम रॅली काढण्यात आली, शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या, त्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवनपरिचय जाणून घेण्याचा व त्यांच्या जीवनातील तत्वे अंगिकारण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रमोद पुनसे, प्रमुख पाहुणे निरंजन देव्हारे,स्वप्नील ढोमणे, मुख्याध्यापक राजू विलायतकर,प्रल्हाद चोपकर, प्रदीप नाईकर, जगदीश खाडे अंकुश ढबाले ,पंकज थोरात निरंजन नगराळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन नगराळे यांनी केले तर आभार पंकज थोरात यांनी मानले..
Discussion about this post