
खडकवासला प्रतिनिधी..
पुणे : भाजपा चित्रपट कामगार आघाडी मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकारी, कलाकार,निर्माते,तंत्रज्ञ यांचा पक्ष प्रवेश आणि नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम भाजपा पुणे शहर कार्यालय येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे पुणे शहर कार्याध्यक्ष राहिलेले, चित्रपट निर्माते तसेच सामाजिक कार्यकर्ते राजीव पाटील यांच्यासह निर्माता शरद पाटील, सहाय्यक दिग्दर्शक रोशनी नागदेवते, कला दिग्दर्शक योगेश इंगळे, दिग्दर्शक नितीन भास्कर, अभिनेता करण दौंड, संकलक विनोद राजे, कार्यकारी निर्माते अमित शेरखाने, पिंपरी चिंचवड शहरातून दिग्दर्शक तसेच संभाजी ब्रिगेड चित्रपट विभागाचे रोहित नरसिंगे, ऍड.अमोल पाटील, अभिजित मोहिते, संदीप कांबळे, चंद्रकांत सुतार, संतोष मोहिते यांनी यावेळी भाजपा चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. चित्रपट आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी केतन महामुनी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी राजीव दत्तात्रय पाटील यांची चित्रपट कामगार आघाडीच्या पुणे शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच प्रदेश उपाध्यक्ष केतन महामुनी यांची सरचिटणीस पदी पदोन्नती करण्यात आली. कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, चित्रपट आघाडीचे समीर दीक्षित यांच्या हस्ते अजित परब,भाजप शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, सहकार आघाडीचे सचिन दशरथ दांगट यांच्या उपस्थिती मध्ये त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना कामगार मोर्चा तसेच चित्रपट कामगार आघाडीच्या कार्याची माहिती दिली. या क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पुणे शहरात भविष्यात मोठे काम होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, अजित परब, रवींद्र साळेगावकर, सचिन दशरथ दांगट यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. केतन महामुनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..
Discussion about this post