
हडपसर,वार्ताहर..
शिवाजीमहाराज केवळ वंशपरंपरागत राजे नव्हते तर ते स्वराज्यसंस्थापक होते. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजीमहाराजांनी रयतेचं राज्य उभारलं.रयतेची काळजी घेतली.शिवरायांचा आदर्श घेऊन आपण समाजासाठी काम करावे असे प्रतिपादन चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय व अक्कूताई कल्याणी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल तुळजापूरे यांनी केले.
चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय हडपसर येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी पोवाडा, भारुड, मनोगते सादर केले. शिवराय आरती चे भव्य आयोजन करण्यात आले. सौ माने टी व्ही यांनी शिक्षक मनोगतात शिवाजीमहाराज यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल तुळजापूरे,पर्यवेक्षिका छाया पवार, मंदाकिनी शिंदे, संस्थेचे आजीव सभासद लालासाहेब खलाटे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते..
Discussion about this post