न्हावेली प्रतिनिधी आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवार २३ फेब्रुवारी रोजी श्री देव गिरोबा मुखकवच संप्रोक्षण विधी ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २३ रोजी सकाळी ८ वाजता शिरोडकर बंधू ( सोनार ) आरोस माऊलीवाडी यांच्या निवासस्थानाकडून ढोल ताशांच्या गजरात दिंडी पथकाने नाचत श्री देव गिरोबाचे मुखकवच ( रुपडे ) श्री माऊली मंदिरात आगमन, सकाळी १० वाजता धार्मिक विधीला सुरुवात होईल.त्यानंतर महाआरती व दुपारी महाप्रसाद त्यानंतर स्थानिकांचे भजन व महिलांची फुगडी,सायंकाळी ७ वाजता श्री देव उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तळवडे ( बुवा – संजय नागडे,पखवाज मेहल कांडरकर यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम,रात्री १० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा “ महान पौराणिक पंचशस्र “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
Discussion about this post