आजरा येथील शिवतिर्थावर शिवजयंती साजरी करणेत आली.
आजरा: तालुका प्रतिनिधी,
आजरा येथील शिवतिर्थावर शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले. महिला लेझीम पथक स्पर्धा तसेच मराठा संघामार्फत याचे नियोजन करणेत आले होते.
शिव तिर्थावर मानेसाहेब तहसिलदार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी आजरा पोलिस ठाणे पोलिस निरिक्षक श्री. यमगर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज सुर्वे, आजरा नगरपंचायत, मराठा महासंघ अध्यक्ष श्री. मारुती मोरेसर, समीर जाधव आजरा तलाठी, भादवणकर तसेच सर्व शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post