महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने एस ओ पी अर्थात आदर्श कार्यप्रणाली जारी केली असून आता १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी आणि नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणे बंधनकारक आहे. सांगली जिल्ह्यातही या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याची माहितीउपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ते म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल तेरा लाख वाहनांना हि नंबर प्लेट बसवण्यात येईल. या एच एस आर पी प्रणाली मध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (युआयएन) आणि लेसर कोड अशा वैशिष्ट्यांसह नोंदणी प्लेट दिली गेली आहे. यामुळे या नंबर प्लेट मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा अदलाबदल करता येत नाही. यामुळे कोणत्याही गुन्ह्यामध्ये परीक्षण करताना या नंबर प्लेट मदतीला येतील. ते पुढे म्हणाले कि ज्या वाहन मालकांनी आपल्या वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी केली आहे त्यांनी या नंबर प्लेट आपल्या वाहनांना लावणे बांधकारक असेल. आणि या तारखेनंतर च्या वाहनांवर वाहन विक्रेते वाहन मालकांना हि प्लेट बसवून देतील. यासाठी दुचाकी वाहनांना ५८१ रु शुल्क आकारले आहे तर इतर वाहनांना वेगवेगळे शुल्क असेल. आणि काही शंका असल्यास आमच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
Discussion about this post