
उदगीर /कमलाकर मुळे :
वाढवणा बु.येथील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव दत्तात्रय मुंडकर (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर वाढवणा बु.येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.ते सुर्या ग्रुपचे अध्यक्ष अजय मुंडकर ,शिक्षक अविनाश मुंडकर यांचे वडील,तर माजी नगराध्यक्षा मनिषाताई मुंडकर यांचे सासरे होते.तरी यांच्या अंत्यविधीस तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमलेला होता..
Discussion about this post