
उदगीर/कमलाकर मुळे : वाढवणा बु.- येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य राजू गलाले साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक जहागीरदार एन.एम. यांनी केले.
यावेळी पर्यवेक्षक प्रा.विरभद्र बिरादार, चेअरमन संतोष सोमासे, प्रा. ज्ञानोबा देशमुख, प्रा.संगम बिरादार, प्रा. उमाकांत कांबळे, प्रा. शफिउल्ला खान, प्रा. प्रा.रविकिरण कांबळे, सुरेश देशमुख, प्रा. संदिप तोडकर, अयुब मुल्ला,प्रवीण भिगोले, माधव बंडे, ज्ञानेश्र्वर बाऱ्हाळे, दिनेश उपासे, अमित तिगोटे, नामवाड, अंकुश बुदराळे,किशोर तोळसरवाड आदी उपस्थित होते..
Discussion about this post