मोहाडी: शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन मोहाडी येथील पी. एस. टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मध्ये १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यन्त इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आवळ तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थांनी डिजिटल कौशल , वेदिक गणित, बौद्धिक विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, स्पोकन इंग्रजी, कॉम्प्युटर कोडींग चे धडे आत्मसाथ करावे म्हणून जिल्हापरिषद हायस्कूल मोहाडी, स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडी, श्री. गुरुदेव चिंतामण बिसने विद्यालय मोहाडी, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कुशारी, खरबी, डोंगरगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी परिक्षेत भाग घ्यावे असे आवाहन प्रितम कुंभारे यांनी केले आहे.
Discussion about this post