आजरा तालुका डिजिटल मीडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर
अध्यक्ष पदी ज्योतीप्रसाद सावंत तर उपाध्यक्ष पदी राजाराम कांबळे याची निवड
आजरा :-आजरा तालुका डिजिटल मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनची नुकतीच सभा संपन्न झाली. या सभेमध्ये असोसिएशनची उद्दिष्टे आणि हेतू स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी मृत्युंजय महान्यूजचे मुख्य संपादक ज्योतीप्रसाद सावंत तर अन्वेषण मीडियाचे तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
आजरा येथे झालेल्या डिजिटल मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या बैठकीत सदर निवड करण्यात आली असून असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी बशीर मुल्ला, सचिव पदी सुभाष पाटील तर खजिनदार पदी अमित गुरव यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी हसन तकीलदार (अन्वेषण मीडिया आजरा प्रतिनिधी ), विकास सुतार, संभाजी जाधव, पुंडलिक सुतार, प्रा. रमेश चव्हाण, गोपाळ गडकरी, यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Discussion about this post