
शिवजयंती निमित्त बुरांडा (ख) येथे वाजणार खंजिरी..
मारेगाव :शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ बुरांडा (ख) व समस्त ग्रामवासी बुरांडा यांचे वतीने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंतीच्या शुभपर्वावर सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनीयर उदयपाल महाराज वणीकर यांच्या सप्त खंजिरीच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी नुकतेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झालेले अविनाश शालिक टेकाम तसेच एसबीआय बँकेमध्ये असिस्टंट म्हणून लागलेले हितेश हरिभाऊ ताकसांडे या गावातील दोन मुलांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे.
दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंती असल्यामुळे सायंकाळी 5 वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. व त्यानंतर अल्पोपहाराचे आयोजन सुद्धा शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ बुरांडा (ख) व समस्त ग्रामवासी यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला आणि दिनांक 18 फेब्रुवारीला होणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे..
Discussion about this post