
अकोट (डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी ) श्री. संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन महोत्सव अकोट तालुक्यात ठीक ठिकाणी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिंडी, पायदळ वारी, भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमाची आज रेलचेल होती. अकोट तालुक्यातील शांतीवन अमृत तीर्थ सजल केलेली विहीर पोपटखेड, अकोली, दिवठाणा, रुईखेड, मुंडगाव, बोचरा, आदी सह तालुक्यातील गावा गावा मध्ये भक्तिमय वातावरणात श्री चा प्रगटदिन महोत्सव साजरा करण्यात आला. शांतीवन अमृत तीर्थ येथे लाखो भाविकां चा जनसागर ओसंडला होता. या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. सामाजिक संघटना यांनी चहा, पाणी, वाहन व्यवस्था निशुल्क सेवा दिली. अकोट ग्रामीण पोलीस यांचा चोख बंदोबस्त होता..
Discussion about this post