

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची
19 फेब्रुवारीला जयंती आहे. त्या निमित्त
वेद आर्ट अकॅडदमी राधानगर कल्याण येथील वेद अकॅदमी च्या विद्यार्थ्यांनी खडकपाडा नमस्ते कल्याण हॉटेल रॉक माउंट बिल्डिंग खडकपाडा येथे कलाशिक्षक यश महाजन सौ भावना महाजन यांनी
आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची ५×८ एकूण ४० चौरस फूट आकारात सुंदर व आकर्षक अशी रांगोळी रेखाटले आहे. हे रांगोळी रेखाटायला त्यांना तब्बल चार ते पाच तास वेळ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा , भाव व्यक्त करण्या साठी
मी दरवर्षी न चुकता रांगोळी ,चित्र ,विविध, उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन काही ना काही उपक्रम राबवत असतो असे यश महाजन सर यांनी सांगितले..
Discussion about this post