त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी :- जयेश राऊत
दिनांक 16 फेब्रुवारी 2025..
हरसुल तालुका त्रंबकेश्वर व परिसरात जिओच्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू असून व्हॉइस कॉललाही आवाज येत नाही,तर इंटरनेटही चालत नाही. त्यामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिओचे नेटवर्क गावागावात पोहोचल्यानंतर, हरसुल परिसरात असलेले बीएसएनएल,आयडिया, वोडाफोनचे ग्राहक हे जिओ मध्ये पोर्ट होऊन,जवळपास 90% ग्रामस्थांकडे जिओचे सिम कार्ड व जिओ नेटवर्क आले.मात्र मागील वर्षभरापासून हरसुल बाजारपेठ व परिसरातील गावांमध्ये जिओला नेटवर्क येते,मात्र फोनला आवाज येत नाही.मोबाईल वरती इंटरनेट चालत नाही. त्यामुळे शेकडो रुपयांचे रिचार्ज हे वाया जात असून, ग्राहकांना आर्थिक भुरदंडाला सामोरे जावे जात आहे. जिओच्या या असलेल्या तक्रारीबाबत हरसुलचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दादागिरीची भाषा करून आम्ही तुम्हाला वरिष्ठांचे नंबर देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, तसेच परिसरातील सरपंचांना सरपंच तुम्ही तुमच्या घरचे , व पत्रकार यांना पत्रकार तुम्ही तुमच्या घरचे,अशा धमक्या देत कंपनीची बाजू सावरली.तर या जिओच्या नेटवर्क नसल्याने हरसुल परिसरातील नागरिकांची आवाज येत-जात नसल्याने चिडचिड होत आहे.तर इंटरनेटच्या साह्याने होणारी ऑनलाइन कामे ही देखील करणे कठीण झाले आहे. तर जिओ प्रशासनाला हरसुल भागात ग्राहकांची संख्या वाढली असून,त्यांनी अतिरिक्त टॉवर किंवा अतिरिक्त नेटवर्कची व्यवस्था करावी. अशी मागणी हरसुल परिसरातील ग्रामस्थ,परिसरातील सरपंच करत आहेत. त्यात विशेष म्हणजे कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा हरसुल परिसरात झाला त्यावेळी हरसुल येथे शिवसैनिक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी एकमेकांना फोन केला असता एकमेकांना फोन लागून आवाज येत नसल्याच्या, घटना घडल्या. त्यामुळे हरसुलला सकाळी आठ वाजले की, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फोनवरती बोलणे ग्राहक टाळत आहेत. तर या नेटवर्कमुळे नागरिकांमध्ये चिडचिड होत असून, दिवसाचे फोनवरचे कामांची नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. जिओनी तात्काळ अतिरिक्त टॉवर व नेटवर्क सुधारावे अन्यथा टॉवर जवळ पूजा करून टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचे हरसुल परिसरातील ग्रामस्थ व सरपंचांनी सांगितले आहे. तर हरसुल येथील असलेल्या जिओचा कर्मचारी,यांना परिसरातील नागरिक नेटवर्कसाठी काय अडचण आहे , यासाठी फोन करत असतात.मात्र तो नेहमी दादागिरीची भाषा करून त्यांना दमदाटी करत असल्याने, त्याला कामावरून तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
अभिप्राय : राहुल बोरसे :- सरपंच तोरंगण ह.
हरसुल बाजारपेठेत जिओचे नेटवर्क असून, येथे फोनला आवाज येत नाही. तर इंटरनेट देखील चालत नाही,मागील वर्षभरापासून या अडचणी जाणवत असताना, जियो प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने,आठवडाभरात यात सुधारणा न झाल्यास टॉवरची पूजा करून, टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे,याची दखल घ्यावी.
छायाचित्र : टॉवर
सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर जयेश राऊत..
Discussion about this post