
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दयानंद चौगुले, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जवाहर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अनिता मुदकन्ना मॅडम, गावातील ज्येष्ठ नागरिक तथा विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन बंडप्पा मामा बिराजदार
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबेद शेख, संदीप वाघोले, माता पालक संघाच्याअध्यक्ष्या सौ.निर्मलाताई पाटील, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अंकिता पाटील या सर्व प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीस शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर चे संस्थापक सचिव आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान ,
सि.ना. आलूरे गुरुजी, व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,पेन देऊन गौरविण्यात आले. सन 2023-24 मधील s.s.c. परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय अलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने रोख रक्कम देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर निरोपाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली . आपल्या मनोगता मध्ये विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल शाळेतील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला.या वर्षाची आदर्श विद्यार्थिनी सरस्वती गुंडराव पाटील ही ठरली. तिचा मेडल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुद्कन्ना मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. मॅडमनी पुढील भविष्यामध्ये यश संपादन कसे करायचे, येणाऱ्या समस्येवर मात कशी करायची, यश मिळाल्यानंतर ते यश कसे पचवायचे ,याबद्दल सविस्तर असे कथेचा आधार घेऊन खूप अनमोल मार्गदर्शन केले. आपले आई वडील, गुरु यांचे कायमस्वरूपी स्मरण ठेवा .त्यांचा आदर राखा. आई-वडिलांनी गुरूंनी केलेले संस्कार कधीच विसरू नका असेही विचार त्यांनी व्यक्त केले. इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांकडून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोडके सर यांनी केले तर आभार बनसोडे सरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले..
Discussion about this post