जवळपास शेंडगेवाडीचे 100/150 एकर क्षेत्र हे मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या (सावरगाव ) नावाने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. देवस्थानची already 100-150 एकर जमीन आहे तरीपण त्याच्या शेजारची जमीन बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे . अक्षरशः एक 400 ते 500 असलेली धनगर लोकसंख्येची वस्ती ऊठून लावण्याचा प्रयत्न याठिकाणी चालू आहे . एकंदरीत हा केवळ एक सामज म्हणून अन्याय आहे. आमची गट ग्रामपंचायत येत आहे गट ग्रामपंचायत असल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून देवस्थान हद्दी पासून 900-1000 मीटर अंतरावर असलेली समाज्यातील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काची जमीन आहे . आणि त्या जमिनीवर देवस्थान ट्रस्ट आणि कमिटी ही आपल्या समाजावर दहशतीने त्यांना त्यांच्या जमीनीत बांधकाम करु न देणे, विहीर खोदू न देणे, असे प्रकार चालू आहे .पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना फोनद्वारे बोलावून कुठलाच कायदा नसताना दबाव टाकला जात आहे कामावरील वाहणे , वस्तू ओढून नेल्या जात आहेत . जाब विचारला असता केवळ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हे करत आहोत असे सांगतात . कारवाईचे कोणतेही proof दाखवत नाहीत. जाब विचारला असता अधिकारी गरिब आणि अडानी समाजाला धाकात घेवून उलट सुलट बोलतात . शेंडगेवाडी सावरगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड. शेंडगेवाडीचा स्वतः मी या गावचा रहिवासी आहे जी वस्ती आहे तिथे धनगर/ इतर ओबीसी समाज आहे आज आमची खूप अडचणीची परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे .या वस्तीतील काही लोक ऊस तोडी तर काही लोक मेंढी पालन करीत आहे जे मेंढी पालन करतात ते बाहेरगावी गेलेला आहेत या वस्तीतून कोणताही अधिकारी नाही किंवा कोनी नोकरीत नाही. त्यामुळे या आपल्या समाजाला माहिती नसते किंवा कुठलेही पाठबळ नाही. तालुका आणि जिल्हाच्या एखाद्या अधिकाऱ्यास विचारल्यास माहिती सांगत नाहीत आणि टाळाटाळ केली जाते . नम्र विनंती करतो जास्तीत जास्त सहकार्य करावे अशी विनंती करतो. हा मेसेज सोशल मीडिया थ्रो जास्तीत जास्त ग्रुप वर व्हायरल किंवा शेअर करावी अशी नम्र विनंती करतो. Mo no 8554980554 / 9405986042/ 8080666520/ 9005200508
शेंडगेवाडी ग्रामस्थ
ओबीसी समाज..
Discussion about this post