



भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम…
डॉ.(अँड) सुनिल भोवते यांची नुकतीच केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाने पब्लिक नोटरी या पदावर नियुक्ती केल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून डॉ. आंबेडकर रोड खार मुंबई येथे “भोवते लॉ असोसिएट “या कार्यालयाचे उद्घघाटनआदरणीय स्टीफन नरोन्हा यांच्या शुभहस्ते करण्यात आले ,या कार्यालयांमध्ये विभागातील जनतेसाठी नवीन सेवा व सुविधा संबधित प्रत्येक आठवड्याला भरविण्यात येईल ,कायदा सहायक , कन्सुमर राइट्स ,डोमेस्टिक कोर्ट्स,करिअर चॉईस व महिला हक्क निवारण मार्गदर्शन करण्यात येईल त्याप्रसंगी ॲड श्रीकांत शिंदे , ॲड मच्छिंद्र माने, ॲड किशोर उबाळे, दिलीप गवई, अरविंद जाधव, संदीप छोवाला,पुष्पाताई शेजुळे, राजू रोडगे ,तसेच बांद्रा बार कौन्सिल असोसिएट, विक्रोली बार कौन्सिल असोसिएट, कुर्ला बार कौन्सिल असोसिएट चे जवळपास साठ सत्तर
वकील, संघ आवर्जून उपस्थित होते , सूत्र संचालन संदीप पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ॲड.सिद्धार्थ गमरे यांनी परिश्रम घेतले, तर सर्व उपस्थितांचे आभार ॲड कल्पना भोवते यांनी मांडले..
Discussion about this post