मिरजेचे तहसील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. रोज हजारो नागरिक आपल्या कामानिमित्त या कार्यालयाच्या वाऱ्या करत असतात. कृषी विभाग असो किंवा रजिस्टार कार्यालय अथवा अन्नधान्य वितरण असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो अगदी सात बारा काढण्यापासून अगदी तहसीलदार यांच्याकडे सुनावणी असो या कार्यलयामध्ये नागरिकांची रोज गर्दी असतेच. असाच एक विभाग जो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीसाठी खरेदी विक्री साठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे अगदी मागील काही वर्षांपासूनच्या दस्तऐवजांचे संकलनही या विभागामार्फत अगदी योग्य रित्या केले गेले आहे. ‘कुळवहिवाट आणि हक्कनोंद’ असे या विभागाचे नाव तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या कारकिर्दी मध्ये या विभागामध्ये आमूलाग्र बदल झाले. येथील विभागाचे सहायक संकलक रितेश कुंभार यांनी तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुयोग्य नियोजन करून आपल्या मंत्रालयातील कामकाजाच्या कारकिर्दीच्या अनुभवाचा उपयोग करत अगदी १९५६ पासूनचे दस्तऐवज विविध पद्धतीने त्या त्या दस्तेवजना लेबल लावून जतन केले आहेत आता प्रतीक्षा आहे ती या दस्तऐवजांच्या संगणकीकरणाची आमच्या प्रतिनिधींनी या विभागाचे संकलक रितेश कुंभार यांच्याशी संवाद साधला असता रितेश यांनी सांगितले कि या विभागामध्ये मी रुजू झाल्यापासून आणि आमच्या तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांच्या सूचनेनुसार प्रथम अस्ताव्यस्त असलेले दस्तऐवज मी संकलित केले साला प्रमाणे त्यांची वर्गवारी केली त्यांना लेबल दिली भविष्यामध्ये कोणीही कर्मचारी सहज रित्या कोणतेही दस्तऐवज सहज शोधू शकेल असे काम आम्ही करत आहोत. यामुळे वेळेची बचत होत आहे नागरिकांना अधिक सेवा प्रदान करता येत आहेत. आमच्या तहसीलदार मॅडम यांचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन यासाठी कारणीभूत आहे. मिरज तालुक्यातील शेतकरी वर्गाला याचा फायदा होताना दिसून येतोय. ते पुढे म्हणाले कि सध्या राज्य शासनाची १०० दिवसांचे गतिमान शासन हि योजना सुरु आहे या अनुषंगाने आम्हाला आनंद आहे कि आम्हीही याचा एक भाग आहोत.
Discussion about this post