तुळजापूर : रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालय, तुळजापूर येथील सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठेपाटील (वय 55) यांना 1.55 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदार हे विद्यालयात कला शिक्षक पदावर कार्यरत असून, त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी ठराव घेण्यासाठी सचिव पेठेपाटील यांनी पंचासमक्ष 1.55 लाख रुपयांची लाच मागितली. आज (21 फेब्रुवारी) त्यांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तपासादरम्यान, आरोपीकडून 6,180 रुपये रोख आणि अंदाजे एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. तसेच त्याच्या घराची झडती घेतली जात आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याचा मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखालील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. अधिक तपास सुरू आहे…
Discussion about this post