
सुशील पवार ,डांग..
मिळालेल्या माहितीनुसार, आज वघई तालुक्यातील दोडीपाडा गावातील रहिवासी सतीशभाई बाळूभाई गायकवाड हे त्यांची मोटारसायकल क्र.जी.जे.30.सी.5095 घेऊन सापुतारा येथील नवोदय विद्यालयात इयत्ता 12वीत शिकत असलेला मुलगा आदित्य याला भेटण्यासाठी निघाले होते.त्यावेळी ते सापुतारा-शीवारीमाळ गावाजवळील वाड्याजवळ लेउवा पाटीदार आश्रम शाळेजवळील वळणावर मोटारसायकल अचानक घसरल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सापुतारा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पी,एम, साठी हलवली आणि पुढची चौकशी केली..
Discussion about this post