
उदयगिरी नगरी टीचर्स क्रिकेट संघाचा दणदणीत विजय..
……..सैनिकी विद्यालयाच्या तीन शिक्षकांचा सहभाग
उदगीर,(श्रीधर सावळे)महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटने तर्फे आयोजित लातूर टीचर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये उदयगिरी नगरी टीचर्स क्रिकेट संघ,उदगीर या संघाने डायमंड स्पोर्ट क्लब यांच्यावर रोमहर्षक विजय प्राप्त करून प्रथम पारितोषिक पटकावला तसेच द्वितीय पारितोषिक डायमंड क्रिकेट स्पोर्ट क्लब उदगीर व तृतीय पारितोषिक केसी पटेल वॉरियर्स यांनी पटकाविले.संपूर्ण सामन्यात मालिकावीर चा पुरस्कार उदयगिरी नगरी टीचर्स क्रिकेट संघाचे खेळाडू मारुती पवार यांना मिळाला तर सामनावीरचा पुरस्कार रमेश फड यांना मिळाला.मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे साहेब,संयोजक सचिन चव्हाण ,स्टार क्लासेसचे व्यवस्थापक शिंदे सर यांच्या हस्ते देण्यात आले .लातूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम शाळा ,विद्यार्थी, खडू व फळा याच्यापासून थोडासा विरंगुळा मिळावा व शिक्षक खेळाडूंना शारीरिक मानसिक तंदुरुस्ती प्राप्त व्हावी , या उद्देशाने केवळ लातूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदरील स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील 16 संघ सहभागी झाले होते.यात उदयगिरी नगरी टीचर्स क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला. श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक श्रीकांत देवणीकर (कर्णधार), नादरगे ज्ञानेश्वर (उपकर्णधार) यांनी संघाचे नेतृत्व केले. बालाजी मुस्कावाड ,मारुती पवार , बालाजी कदम, भालचंद्र कलमुकले , विशाल पवार , रमेश फड , हणमंत मोरे , अनिल तेलंगे प्रदीप नेळगे , राहूल राठोड , रोहण आडे , बालाजी कांबळे यांनी उदयगिरी नगरी टीचर्स क्रिकेट संघ,उदगीर मध्ये आपली खेळाडू म्हणून मोलाची भूमिका निभावली. या संघातील सर्व खेळाडू शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे उदगीर तालुक्यातील विविध शाळेत कार्यरत आहेत.यांच्या या विजयाने कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,सचिव यांनी व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील सहभागी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक केले.
Discussion about this post