
अकोट ..
(डॉ. संतोष गायगोले अकोट तालुका प्रतिनिधी ) रुईखेड वासियांचे ग्रामदैवत असलेल्या श्री. बागाजी महाराज यांच्या यात्रे निमित्त भंडारा उत्सव समिती च्या वतीने दि. 2 फेब्रुवारी ला सकाळी 9ते 12 या वेळेत जि. प. शाळा रुईखेड येथे भव्य महाआरोग्य निदान शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अकोट येथील डॉ. निखिल धांडे, डॉ. मयूर व्यवहारे, डॉ. दर्शन कुलट, डॉ. परवेज खान आदी तज्ञ् डॉ. मंडळी रुग्ण तपासणी करणार आहेत. या शिबिरात मोफत औषध वितरण, तसेच गरजेनुसार ई. सी. जी. मोफत करण्यात येईल जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला ची चमू रक्त संकलन करणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे..
Discussion about this post