प्रतिनिधी फुलंब्री : अमोल कोलते *
फुलंब्री मध्ये पंचायत समिती मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याचे आयोजन
फुलंब्री : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत फुलंब्री तालुकयाकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार (दि.22) रोजी दुपारी 3 वाजता तहसिल कार्यालय फुलंब्री सभागृह येथे संपन्न झाला . या कार्यक्रमास फुलंब्री विधानसभेचे मा.आमदार अनुराधा ताई चव्हाण अध्यक्षस्थानी होते., अशी माहिती पंचायत समिती फुलंब्री चेगटविकास अधिकारी उषा मोरे मॅडम यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद चे विकास मिना यांनी माहिती दिली . ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याच पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.फुलंब्री तालुक्यातील मंजूर ३००० हजार उद्दिष्टांपैकी सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात आला. यावेळी उपस्थित आमदार अनुराधा ताई चव्हाण ,गटविकास अधिकारी उषा मोरे , नायब तहसिलदार संजय राऊत, घरकुल चे संतोष वखरे सर ,भाजप तालुकाधक्ष साडुअण्णा जाधव, माजी सभापती सविताताई फुके, सुमित बोरसे, राजु डकले,बाळासाहेब तांदळे. सर्व कर्मचारी भाजपा पदाधिकारी ,व लाभार्थी उपस्थित होते.
Discussion about this post