लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचे क्षण..
लोहा कंधार प्रतिनिधी…..
पंतप्रधान महा आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील दहा हजार आठशे घरकुल लाभार्थ्याच्या खात्यात आज पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण टप्पा दोन मधील मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण आज तहसील कार्यालय लोहा येथून माजी खासदार लोकप्रिय आमदार प्रतापरावजी चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याच मोहिमे अंतर्गत तालुक्यातील दहा हजार आठशे घरकुल लाभार्थ्याच्या खात्यात आज पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनाकडून वर्ग करण्यात आला. ही योजना लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती राबवली गेली. यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे . प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गोरगरीब जनतेचे घराचे कामे उत्कृष्ट व मजबूत होत आहेत .तसेच ज्या ठिकाणी घरकुलाचे कामे चालू आहेत त्या ठिकाणाहून जिओ टॅगिंग करून ऑनलाईन लाभार्थ्याची माहिती शासनाकडे वर्ग केली जात आहे. त्यामुळे घरकुल विभागाची अधिकारी नियमित कामे करत असल्याचे दिसून येते त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अडचणी होत्या त्या अडचणी दूर झाल्या आहेत .व यानंतर पंतप्रधान आवास योजना योग्य रीतीने राबवली जाईल, असे गटविकास अधिकारी साहेबांनी सांगितले..
Discussion about this post