सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने सध्या नागरिकांना अवास्तव घरपट्टी बिले पाठवून सत्व परीक्षा बघायची ठरवली आहे काय? वाढीव घरपट्टी च्या नोटीस महापालिका प्रशासनाने माघारी घ्याव्यात अन्यथा नागरिकांसह आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार गट) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भोसले यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले आम्ही या वाढीव घरपट्टी विरोधात कायदेशीर लढाई तर लढणार आहोतच मात्र प्रशासनाने नागरिकांची बाजू न ऐकल्यास रस्त्यावरही आम्ही उतरू. अभिजित भोसले यांनी शिष्टमंडळासह मालमत्ता कर निर्धारण आणि संकलक उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. भोसले यांनी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याशी चर्चा करताना वाढीव घरपट्टी नोटिसा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. घरपट्टी आकारणी संदर्भात जुन्या धोरणानुसार आणि ठरावानुसार महापालिकेने योग्य धोरण अवलंबावे, तोपर्यंत घरपट्टी नोटीस देणे थांबवावे सर्वमान्य अशा कराचे धोरण राबवावे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा यासंदर्भात महापालिकेमध्ये आढावा बैठक घेणार आहेत त्यावेळी आम्ही आमचे म्हणणे निश्चितपणे मांडणार आहोत तसेच कर आकारणीचे नव्याने धोरण ठरत नाही तोपर्यंत नोटीस कोणालाही वितरित करू नये अशी आमची भूमिका राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मालमत्ता सर्वे टीम चे सदस्यही या बैठकीला उपस्थित होते.
Discussion about this post