22 Total Views , 1 views today
उदगीर /कमलाकर मुळे:
तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुदानित या गटातून हॅकेथॉन विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.या प्रयोगाची आता पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील चिमुकल्याणी लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोग स्पर्धेत करण्यासाठी धूपबत्ती व अगरबत्ती बनविण्याचा प्रयोग सादर केला या प्रयोगाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.यात विद्यार्थी श्रीमंगले योगेश मारुती व कासले प्रतीक निवृत्ती यांचा समावेश आहे. यशस्वितांचे डायटच्या प्राचार्य डॉक्टर भागीरथी गिरी ,डॉक्टर मारुती सलगर, डॉक्टर जगन्नाथ कापसे डॉक्टर राजेश गोरे, गंगा मेनकुदळे, गटशिक्षणाधिकारी शेख केंद्रप्रमुख राघोबा घंटेवाड संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गोविंदरावजी केंद्रेजी,संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक नादरगे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post