
प्रतिनिधी : अकोला बाजार..
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निमित्त शिवजन्मोत्सव समिती आणि नवसंकल्प प्रतिष्ठान अकोला बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत येथे १७ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
जग हे समृद्धी कडे वाटचाल करिता असतांना आरोग्याच्या बाबतीत मात्र एक पाऊल मागेच आहे, आणि वेळ प्रसंगी एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची गरज पडल्यास त्याच्याकरिता रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने गावातील तरुणांनी तसेच काही महिलांनी एकत्र येत रक्तदान करून महादान केले.
ग्राम पंचायत अकोला बाजार सरपंच योगेश राजूरकर व उपसरपंच प्रविण मोगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.व यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढी संकलन विभाग यांनी सहकार्य करत सर्वांना रक्तदान विषयी माहिती दिली. यावेळी शिवजन्मोत्सव समिती आणि नवसंकल्प प्रतिष्ठान च्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानून येत्या काळात सुद्धा अशीच गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी नवसंकल्प प्रतिष्ठानचे वैभव जाचक, राम कोटरंगे,अक्षय ठाकरे,श्रावण वाघाडे, सचिन कोयरे,अक्षय चौधरी,आशिष परचाके, अक्षय शेंद्रे, वृषभ टेकाम,प्रविण राठोड,सूरज घनकर, बबलु जगताप,गौरव जगताप, सुजल कोराणे, संदीप ठाकरे, लकी ठाकरे,आसिफ शेख,पवन जगताप, पंडित खंडारे, राजेश नन्नवरे, अरुण कराळे,राजू कडू, ग्राम पंचायत कर्मचारी भोला खंडारे यांनी या शिबिरासाठी मदत केली..
Discussion about this post