” टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या भागाला मिळणार पाणी “
संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामस्थाच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग, पुणे येथील अधिकार्याशी चर्चा.
कडेगांव प्रतिनिधी.
कडेगांव शहरास, तालुक्यातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथे जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्राम(भाऊ) देशमुख यांनची ढाणेवाडी, खेराडे वांगी, उपाळे वांगी, उपाळे मायणी, तोंडली या गावातील वंचित असणारे शेत जमिनीस टेंभू योजनेच्या जोड कालवा – २
च्या ल.पा. तलाव हिंगणगाव बुद्रुक मधून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे टेंभू प्रकल्पातून शाश्वतपणे मिळणेबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी शिवाजीनगर तलाव येथून कडेगाव तलावास पाणी देणेबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असून तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून अद्याप वंचित असणारे ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून, हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगांव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या वेळी ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार, एम. जी. पाटील यांच्यासह ढाणेवाडी गावचे जेष्ठ नेते शिवाजी ढाणे, बाळासाहेब धनवडे, विकास माने, हणमंत ढाणे, हिंदुराव यादव, सतीश आबा यादव, सतीश बापू यादव उपस्थित होते.
फोटो ओळ.
टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या गावांना पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभाग पुणे येथील मुख्य अभियंता एच. व्हीं.गुणाले यांच्याशी चर्चा करताना भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख सोबत ग्रामस्थ
.
चौकट.
” कडेगांव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नेर्ली तलावामध्ये शिवाजीनगर तलावा मधून बंदिस्त पाईप लाईनने पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर होणार असून शहराचा पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.”
Discussion about this post