प्रतिनिधी सुधीर गोखले
सारथी महाराष्ट्राचा
कोलकात्यामध्ये महाविद्यालयामध्ये बळी गेलेल्या ‘निर्भया’ च्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात असंतोषाची लाट पसरली आहे. काल सांगली मिरजेच्या शासकीय वैद्यकीय इस्पितळातील शेकडो डॉक्टर्स नि निर्भया च्या समर्थनार्थ दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आणि सांगली मिरजेतील शासकीय इस्पितळातील सुरक्षा व्यवस्थेबाबत निवेदन दिले.
कोलकात्यामधील महाविद्यालयात क्रूरतेने महिला डॉक्टरची हत्या झाली त्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या राज्य संघटनेने (मार्ड) संप पुकारला असून सांगली मिरजेतील दोनशे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु ठेवले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून वैद्यकीय सेवेवर यामुळे मोठा परिणाम झाला आहे. ‘निर्भया’ च्या समर्थनार्थ नुकतेच मिरज आणि सांगली IMA ने हि कँडल मार्च काढून या क्रूर हत्येचा निषेध नोंदवला होता.
काल निवासी डॉक्टरांनी मिरजेतील शासकीय वैद्यकीय इस्पितळापासून दुचाकी वरून निषेध रॅली सुरु केली सांगलीतील राम मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ती विसर्जित केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दोनही इस्पितळांमध्ये सुरक्षे सह विविध मागण्यासाठी निवेदन दिले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ आमोद भडभडे, उपाध्यक्ष डॉ फातिमा शेख, डॉ श्रेयस कुलकर्णी, सचिव शुभम पंडित, डॉ आशिष सचदेव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post