
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील सरस्वती वाचन व शिक्षण संस्था, ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय येथे दि. २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करून आभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, संस्थेचे सचिव महेंद्रकुमार सकलेचा यांनी गाडगे महाराजांच्या जीवनचरित्राची माहिती दिली. आभार प्रदर्शन वाचक कमिटीचे अध्यक्ष राहुल नवपुते यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तय्यब पटेल, निवृत्त शिक्षक बबनराव नवपुते, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमाने, वाचक कमिटीचे ओमप्रकाश तुपकरी, रामनारायण धुत, महावीर खोबरे, मोरे, गायकवाड, वाव्हळ, प्रकाश काजळे यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती..
Discussion about this post