
गणेश राठोड,
तालुका प्रतिनिधी / उमरखेड..
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सामाजिक बांधिलकीची जाण असलेले, अन्यायाविरोधात लढणारे आणि विद्यार्थ्यांसाठी सतत प्रेरणादायी कार्य करणारे विवेक पांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विवेक पांढरे हे केवळ पत्रकार नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढे उभारले असून, अन्यायाविरोधात निर्भीड भूमिका घेतली आहे. त्यांच्या लेखणीने समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे. तसेच, मागील तिन वर्षापासुन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांना शिक्षण व करिअर घडविण्यासाठी मदत करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
विवेक पांढरे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे फुलसावंगीतील पत्रकार संघाला एक कणखर आणि न्यायप्रिय नेतृत्व मिळाले असून, पत्रकारिता व सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ गजानन वैद्य, शेख तसलीम, शैलेश वानखेडे, विवेक शेळके,संजय जाधव, ज्ञानेश्वर सोमेवाड, चंद्रशेखर पंडागळे, शेख रिजवान, शैलेश पेंटेवाड, विक्की भिसे,करम खान, सचिन छन्नीकर हे उपस्थित होते.
Discussion about this post