
सारथी महाराष्ट्राचा=नेवासा तालुका प्रतिनिधी= नाथाभाऊ शिंदे पाटील . नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे महायुती सरकारचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या आभार दौऱ्याला बेलपिंपळगाव येथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.{ कार्यकर्त्यांनी केली आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचीशेरनी गुळाची तुला... नवस पूर्ती साठी शेरनीचे वाटप केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी बेलपिंपळगाव या जिल्हा परिषद गटातूनच माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे यामुळेच मी अहमदनगर जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करू शकलो आता तर मला या मतदारसंघाने आमदारच केले आहे. आता मला या बिल पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील सर्वतोपरी विकास करावयाचा आहे आणि मी तो करणारच! अशी ग्वाही याप्रसंगी आमदार लंघे पाटील यांनी दिली. कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन श्री गणेश चौगुले, यांनी केले. तसेच कुणाल बोरुडे गावचे सरपंच कृष्णा शिंदे, चंद्रशेखर गटकळ ,राहुल शिंदे, श्रीकांत शिंदे,बकसू शिंदे, महेश शेरकर, गजानन मंडलिक, चंद्रकांत सरोदे, विशाल चौगुले, उमेश कांगुणे, सोमनाथ कुऱ्हाडे,शिवसेना उप तालुका अध्यक्ष भारत चौगुले, आप्पासाहेब शिंदे सर , प्रणव कोकणे, राहुल शिंदे, संकेत शिंदे, यांच्यावतीने आमदार साहेबांचा नागरि सत्कार करण्यात आला. आभार दौऱ्यानिमित्त तालुका कामगार आघाडीच्या वतीने कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर देखील भारत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते उद्घाटन करून कामगाराचे आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उद्योगपती व पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशराव डिके, विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, शांताराम तुवर, बाळासाहेब पवार आदिनाथ पटारे, रामेश्वर गाडेकर प्रकाश निपुंगे आदी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post