
रांजणगाव गणपती,
प्रतिनिधी : बाळासाहेब कुंभार..
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेश्री क्षेत्र वडू बुद्रुक येथे रविवार दिनांक०२मार्च२०२५रोजीरक्तदान महायज्ञाचे आयोजन केले असून सर्व शिवप्रेमी व शंभू भक्तानेसहभागी व्हावे तसेच शिरूर ,हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमा ,वढू बुद्रुक ,आपटी डिग्रज वाडी रांजणगाव गणपती मलठण कारेगाव गुणाटसह इतर गावांमध्ये तर हवेलीतील इतर गावासह श्रीक्षेत्र तुळापूर नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे. व धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे याची सुरुवात फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे२८फेब्रुवारी ते २९मार्चह्या कालावधीमध्ये होणार आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञताम्हणून बलिदान मास पाळला जातो.
औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांना ४०दिवस वेदना देऊन हत्या केली शंभूराजांना ४०दिवस वेदना दिल्या याची या महिन्यात जाणीव राहावी म्हणून चाळीस दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायची नाही. गादी ऐवजी जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रद्धांजली व बलिदान मास पाळला जातो. बलिदान मास ही समाजमन घडविणारी प्रभावी अशी श्रद्धांजली वाहण्याची पद्धत आहे.
प्रत्येक गावात परिसरातील मंदिरामध्ये रोज सकाळी /संध्याकाळी छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण केले जाणार आहे. शिवप्रेमींनी सर्व बांधवांना हे समजून सांगावे .
त्याचबरोबर रक्तदान महायज्ञाचेआयोजन श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथे केले असून हे रक्तदान महायज्ञाचे चौथे वर्ष आहे सर्व शिवप्रेमी व शंभू भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन परिसरातील शंभू भक्त व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे कार्यकर्ते करत आहेत..
Discussion about this post