
प्रतिनिधी प्रमोद जमादार..
शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील बाळदे येथील रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात महिलेला चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना 21 फेब्रुवारीला दुपारी घडली त्यानंतर संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवून आक्रोश व्यक्त केला याबाबत माहिती मिळवून मिळालेली माहितीनुसार अर्थ येथील रहिवासी कांतीलाल शिरसाठ व त्यांची पत्नी मालतीबाई शिरसाठ वय 45 राहणार आर्थे बु. हे शिंदखेडा येथून परत येताना गिधाडे मार्ग अर्धे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. गिधाडे बाळदे रस्त्यावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या घटनेत कांतीलाल शिरसाठ एका बाजूला फेकले गेले तर ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आलेली मालतीबाई चिडल्या गेल्या त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संतप्त जमावाने त्या ट्रॅक्टरची तोडफोड करून ते पेटवून दिले पोलिसांनी घटनास्थळी पोचून त्या जमावावर नियंत्रण केले अवैध वाळू अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे त्यांचा बळी गेल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केले असून प्रशासनाने अशा वाहतुकीवर नियंत्रण घालावे अशी मागणी देखील केली आहे..
Discussion about this post